वैयक्तिक ओळखपत्र ज्याला identity proof असे म्हणतात ज्यामधे खालील ओळखपत्र सादर करावी लागतात..
PAN कार्ड, आधार कार्ड, ड्राइवर लाइसेन्स, असल्यास पासपोर्ट इत्यादि.
जागेचा ओळखपत्र ज्यामधे तुम्ही कुठे व्यवसाय सुरू करणार आहात त्याची माहिती द्यावी लागते..
स्वतःची जागा असेल तर 7/12, प्रोपर्टी कार्ड, लाइट बिल, खरेदी खत इत्यादी.
भाड्याची जागा असेल तर भाडे करार, भाड्याच्या जागेच लाइट बिल, लागल्यास मालकाची संमती पत्र इत्यादी..
लक्षात ठेवा जर भाडे करार असेल तर शक्यतो बँक अधिक मुदतीचा करार मागते जसे की 5 किंवा 7 वर्ष.
जर MIDC मध्ये व्यवसाय करणार असला तर ट्राय पार्टी अॅग्रीमेंट, MIDC लीज डिड इत्यादी मागितले जाते.
मग येते व्यावसायिक ओळख पत्र ज्यामधे खालील कागदपत्र येतात..
व्यवसाय कुठल्या स्वरुपात करताय त्याचा पुरावा म्हणजे एकटे करणार असाल तर शॉप ऐक्ट किंवा ग्रामपंचायत दाखला, फर्म स्वरुपात करणार असाल तर फर्म डीड, कंपनी करणार असाल तर कंपनी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजेच Certificate of Incorporation, एमओए आणि एओए, याच बरोबरीने व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे इतर पुरावे म्हणजे पूर्वी उद्योग आधार होते आता तुम्हाला उद्यम रजिस्ट्रेशन घ्यावे लागेल, स्थानिक ऑथॉरिटी कडून व्यवसाय सुरू करायची परवाना, जर फूड प्रोसेसिंग करणार असाल तर फूड लाइसेन्स, पोलूशन लाइसेन्स इत्यादी.
हे झाले एकंदर व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे ओळखपत्राचे कागदपत्र त्या नंतर येतात काही महत्वाची कागदपत्र पुढीलप्रमाणे...
जर पूर्वी पासून व्यवसाय करीत असाल तर मागील वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न्स, जीएसटी नंबर असेल तर आजपर्यंत भरलेले रिटर्न्स, किमान 1 वर्षाचे उलाढाल असलेले बँक स्टेटमेंट इत्यादी.
याच बरोबरीने सर्वात महत्त्वाचे प्रोजेक्ट रिपोर्ट...
प्रोजेक्ट रिपोर्ट इत्यंभूत हवा.. त्यात तुमचे टेक्निकल आणि फायनान्स बरोबर इतर सर्व प्रकारची माहिती हवी उदा. कसल्या प्रकारचा व्यवसाय करणार, कुठे करणार, मशीन आणि इतर साधनांची माहिती, जर मॅन्युफॅक्चरिंग करणार तर कच्चा मालाची माहिती, जी वस्तू तयार करणार त्याची प्रोसेस, माल कुठे विकणार, बाजार व मार्केट सबंधी माहिती अशी बरेच गोष्ठी त्यात येतात..
या नंतर तुम्ही यात ऑर्डर कॉपी जोडल्या पाहिजेत.
जर कोणते कोर्स किंवा एखाद्या माहितीपूर्ण सेमिनार या व्यवसायाबद्दल केला असेल तर त्याची कागदपत्र जोडली पाहिजेत.
शेवटी
जर तारण देऊन कर्ज करणार असलात तर त्या तारण संबधीत कागदपत्र जसे की खरेदी पत्र, 7/12 ,8 अ, जागा नॉन एग्री असेल तर तशी सरकारची ऑर्डर इत्यादी.
तर अश्या वरील उल्लेख केलेली सर्व कागदपत्र गोळा करून त्याची 2 फाईल तयार करून तुम्ही एक बँक मध्ये व एक स्वतः कडे ठेवून कर्जाचा पाठपुरावा करू शकता..
Nitin hargude CA
Comments
Post a Comment