किराना मालाचे दूकान / सुपर मार्केट

व्यवसाय कल्पना 2  : -

*_किराना मालाचे दूकान / सुपर मार्केट_*

मला जर कुणी विचारले सर्वात सुरक्षित व्यवसाय कोणता तर मी किराना मालाच्या दुकानाचा पर्याय सुचवेन कारण माणसाला जगन्यासाठी जेवण जेवायला लागेल सोबत सकाळी उठल्यापासून दात घासने , आंघोळ , मेकअप , जिभेचे चोचले पुरवन्यासाठी कोल्ड्रिंक आणि इतर नमकीन ह्या सर्व वस्तू मिळण्याचे ठिकाण म्हणजे किराना मालाचे दूकान ; ज्या धंद्याला मरण नाही आसा व्यवसाय म्हणजे किराना मालाचे दूकान आणि किराना मालाच्या दुकानाचे मॉडर्न स्वरुप किवा साध किराना मालाचे दूकान आणि मोठे पॉश मॉल यांचा सुवर्णमध्य म्हणजे सुपर मार्केट ( मिनी मॉल )
सर्वात प्रथम भरपूर लोकवस्ती असलेल्या ठिकाणी *_चौकात / नाक्यावर किवा किमान रोडला लागून ग्राउंड फ्लोअरला_* स्वताचा गाळा पाहिजे किवा नसेल तर भाड्याचा गाळा शोधने . तुम्हाला जर साध किराना मालाचे दूकान टाकायचे असेल तर 300 sqft चे दूकान enough आहे पण सुपर मार्केट टाकायचे असेल तर किमान 600 sqft क्षेत्रफलाचा गाळा पाहिजे .

गाळ्याची व्यवस्था झाल्यावर फर्नीचर ( साध दूकान असेल तर लाकडी मांडण्या / शोकेस आणि सुपर मार्केट असेल तर लोखंडी रॅक बनवून घ्यावेत )

बाजारात फिरून थोड़ा त्रास सहन करून चार ठिकाणी  चौकश्या करून स्वस्तात किराना माल भरायचा ; जास्तकरून unbranded item खरेदी करताना आस करायला लागते आणि approx 8 - 30 % सूट भेटते ह्याच मार्जिनमधून आपल्याला वाहतूक , गाळ्याच भाड़े , आणि इतर खर्च भागवून आपला फायदा काढावा लागतो

नंतर सर्वात महत्वाचा भाग चालु होतो मार्केटिंग / जाहिरात जो व्यवसायाचा आविभाज्य भाग आहे , सर्वात प्रथम दुकानाच्या नावाचा आणि लोगोचा एक आकर्षक फ्लेक्स बनवून घ्या , बजेट जास्त असेल तर LED किवा आंधारात लोकांच्या सहज लक्षात येईल आसा फ्लेक्स बनवून घ्या . 8 - 10 हजारांच्या आसपास पैम्पलेट वाटा अजुन बरेच फंडे आहेत मार्केटिंगचे पण ज्याच त्याने डोके चालवावे .

सर्व शासकीय परवानग्या घ्या जसे की शहरात दूकान असेल तर गुमास्ता , खेड्यात असेल तर ग्रामपंचायतीची NOC , फ़ूड लायसन्स , GST वैगरे आणि सुरवातीला महत्वाचे वाटत नसेल तरी वरील कागदपत्रांच्या आधारावर दुकानाच्या नावाने करंट अकाउंट उघडून घ्या नंतर व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी बिजनेस लोन मिलवन्यासाठी ,  स्वाइप मशीनसाठी आश्या अनेक कारणांसाठी करंट अकाउंट गरजेचे आसते

जर किराना मालाचे दूकान टाकनार असाल तर तुमचे काम पूर्ण झाले आत्ता तुम्ही व्यवसाय सुरु करू शकता पण जर तुम्हाला सुपर मार्केट सुरु करायचे असेल तर ख-या अर्थाने तुमचे काम आत्ता सुरु होते , चोरी होऊ नये म्हणून precaution म्हणून CCTV आणि इतर मशीनरी लावणे , कॉम्पुटरराइज बिलिंग सिस्टममध्ये सर्व systematic entry करणे ई

ईथे एक गोष्ट लक्षात ठेवावी 25 - 40 वयोगटातील तरुण जोडप्याना सेल्फ सर्विस / सुपर मार्केटचे बरेच attraction आसते

गुंतवणूक :-
साधे किराना मालाचे दूकान - 1.5 - 2 लाख
सुपर मार्केट / मिनी मॉल - 6.5 - 7 लाख
( ह्या गुंतवणुकीमध्ये आपण जो किराना सामान विकन्यासाठी भरतो ती गुंतवणूक , फर्नीचर आणि इतर सेटअपची किंमत calculate केली आहे परंतु प्रत्येक लोकेशननुसार गाळ्याच्या  डिपॉजिटची रक्कम ह्यात पकडली नाही ) . 

*_व्यवसायविषयी जास्त विस्तृतमध्ये माहिती पाहिजे आसल्यास वेळ घेऊन समक्ष भेटल्यास विनामूल्य मिळेल पण पूर्ण सेट अप करून पाहिजे आसल्यास सेट अप चार्जेस paid करावे लागतील_*

संपर्क - समीर गावंड ओनर @ स्वराज इंटरप्रायजेस JNPT नवी मुंबई
8097107756  /  7738223159

*मूळ लेखकाचे नाव डिलीट न करता तुम्ही हा लेख तुमच्या इतर ग्रुपवर शेयर करू शकता*©

*_ध्यास 2020 पर्यंत 111 उद्योजक घडवन्याचे_*

Comments

  1. मला किराणा दुकानामध्ये सामान भरण्यासाठी किराणा मालाची यादी हवी आहे

    ReplyDelete
  2. Mala kirana dukan our setup karaycha aahe

    ReplyDelete
  3. मला किराणा दुकानामध्ये सामान भरण्यासाठी किराणा मालाची यादी हवी आहे

    ReplyDelete
  4. मला किराणा दुकानामध्ये सामान भरण्यासाठी किराणा मालाची यादी हवी आहे

    ReplyDelete
  5. Mi ek gruhini ahe pan mala kirana dukan takaychi khup vrshya pasun iccha ahe, pan bhiti vat te saglyat adhi tr permission kuthun ghya chi ani license kase kadhayche nanter grahakache bill tax ya baddal thodi savister mahiti patha na plijj

    ReplyDelete
  6. मला किराणा दुकानामध्ये सामान भरण्यासाठी किराणा मालाची यादी हवी आहे

    ReplyDelete
  7. सर मला एक नवीन व्यवसाय चालू करायचा आहे त्यासाठी मार्गदर्शन करा

    ReplyDelete
  8. मला किराणा मालाची यादी हवी व होलसेल किराणा कुठे मिळेल

    ReplyDelete
  9. किराणा मालाची यादी
    http://michkashala.blogspot.com/2011/02/blog-post_21.html

    ReplyDelete
  10. मला नविन किराणा दुकान टाकायचे आहे खच किती येणार आहे

    ReplyDelete
  11. सर मला किराणा दुकान चालू करायच आहे ,,माझा गाव सर्कल ठिकाणी आहे व 5 ते 6 खेडीगाव जवळ आहे आणि आठवडी बाजार पण भरतो आमच्या गावी,,तर मला होलसेल दुकान चालवायचं आहे तर किती जागा लागेल व खर्च किती येईल

    ReplyDelete
  12. मला किराणा दुकान माल कुठे मिळेल

    ReplyDelete
  13. मला किराणा दुकान माल भरायचा आहे कुठे मिळेल जास्त मार्जिन ठेवून

    ReplyDelete
  14. मी एक गृहिणी आहे मला किराणा मालाचे दुकान किंवा मिरची आणि गरम मसाले याचे दुकान चालू करायचे आहे पण माझ्याकडे भांडवल नाहीय सर्व 0 पासून सुरवात करायची आहे तर मला काही सांगू शकता का कस आणि काय करावे लागेल

    ReplyDelete
  15. सर मला एक नवीन व्यवसाय चालू करायचा आहे त्यासाठी मार्गदर्शन कराआणि मला किराणा मालाची यादी हवी व होलसेल किराणा कुठे मिळेल

    ReplyDelete

Post a Comment