फेज ओळखण्याचा सेन्स स्वतःत निर्माण करा...


--------------------
जीवनात कोणती गोष्ट कधी करावी म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवन अधिक सुखी, आनंदी व श्रीमंत होईल यालाच म्हणतात फेज ओळखून निर्णय घेणे. मग तो गुंतवणुकीचा असो, शिक्षणाचा असो, करिअरचा असो, उद्योग निवडण्याचा असो किंवा  विवाह करण्याचा असो. कोणत्याही क्षेत्रात व्यक्तीचे, व्यवसायाचे, मार्केटचे सर्वसाधारण तीन फेज असतात.

पहिला 'ग्रोईंग फेज', ज्यात लहान प्रमाणात सुरुवात होऊन प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू असते. हा भाग सर्वसाधारण ३०% असतो. फेज दोन म्हणजे 'पीकहवर', जो जीवनातील सुवर्णक्षण व सर्वाधिक संधीची कमविण्याचा वेळ. तो अंदाजे ३०% ते ४०% असतो. फेज तीन म्हणजे 'अॅव्हरेज टू डाऊन स्टे' ह्या वेळेत तुम्हाला खूप काही करता येत नाही, तुम्ही फक्त जगत राहता. ह्या तिन्ही फेज तुमच्या आयुष्यात केव्हाही येऊ शकतात. उदा. २०१० च्या दरम्यान प्रॉपर्टी व शेती मधील गुंतवणूक हा सर्वाधिक चांगला फेज होय. मुंबईच्या बाहेरील असल्यास १ बीएचके फ्लॅट ८ ते १२ लाखात, तर जिल्ह्यापासून काही किलोमीटरवर शेतजमिनी ३ ते ४ लाख रुपये प्रति एकर मिळत होत्या. आज त्याच १ बीएचकेची किंमत ५० लाख रुपये, तर शेतजमिनी १२ ते १५ लाख एकर झाल्या आहेत. म्हणजे नऊ वर्षांत ४ पट परतावा, पण आता याच क्षेत्रात तिसरा फेज चालू आहे.

बर्‍याच जणांना विवाहाचा निर्णय घेताना आपली गोल्डन फेज ओळखता येत नाही. त्यामुळे उगाचच अनेक स्थळे बघताना सुटतात व त्यात ३ ते ५ वर्षे वाया जातात व शेवटी काळ निघून जातो. वय वाढते व लग्नाच्या मार्केटमध्ये आपली किंमत कमी होते. फार फिरलेल्या मालाला मार्केटमध्ये किंमत नसते हे लक्षात ठेवा. जास्तीजास्त स्थळे बघण्याची सवय खूप वाईट आहे. त्यामुळे चांगले ऑप्शन मिळेल असे वाटते, पण तसे नाही त्यात तुमचेच अवमूल्यन होते, कन्फ्युजन वाढते व शेवटी घाईत व प्रेशर खाली येऊन तडजोड करून लग्न करावे लागते. चांगला बॅट्समन जशी आपली शक्ती बॉलचा अंदाज घेऊन ज्यावर आपण चौकार, षटकार मारू शकतो त्यावरच खर्च करतो. तर सामान्य बॅट्समन प्रत्येक बॉलवर बॅट फिरवीत बसतो. जसे शिक्षणाच्या बाबतीत १९९२-२००० पर्यंतचा काळ इंजिनीअरिंग, तंत्र, शिक्षणासाठी, तसेच स्पर्धापरीक्षांसाठी चांगला होता, अनेक जणांची महाराष्ट्रातून आयएएस, आयपीएल तसेच चांगल्या कंपन्यांमध्ये निवड झाली. बरेच जण अमेरिका, इंग्लंडला गेले, ती त्या क्षेत्राची गोल्डन फेज होती. राजकारणातसुध्दा तुम्हाला काही मिळवायचे असेल, तर कोणत्या पक्षात, कोणत्या विभागात गोल्डन फेज चालू आहे ओळखावे. त्यामुळे फेज ओळखा, चाणाक्ष व्हा. मौका देखके चौका मारो. उगाच राबत बसू नका. चौकस व्हा, जागृत व्हा, व्हॉटसअप, फेसबुक थोडे बाजूला ठेवा व घराबाहेर पडा. राज्य, देश फिरा, लोकांना भेटा, मार्केट पहा. त्याशिवाय फेज ओळखण्याचा सेन्स डेव्हलप होणार नाही.

- प्रा. प्रकाश भोसले, सीईओ ई-ब्रँडिंग इंडिया
व्हॉटसअॅप क्रमांक -९८६७८०६३९९
-----------------------

Comments