श्रीमंत लोक पैशांसाठी काम करत नाहीत
तर त्यांचा पैसा त्यांच्यासाठी काम करतो. गरीब आणि मध्यमवर्गीय लोक पैशांसाठी काम करतात. जीवन तुमच्याशी बोलत नाही. ते तुम्हाला धक्का देतं. प्रत्येक धक्का ही सूचना असते की यातून काही शिक, धडा घे, बदल. तुमची समस्या तुम्ही स्वतः आहात. तुम्ही स्वतःला बदलू शकता, शिकू शकता, जास्त समजदार बनू शकता. अनेक लोकांना जग बदलायचं असत पण स्वतःला बदलायचं नसत. स्वतःला बदलणे हे जग बद्दलण्यापेक्षा सोपं आहे. अनेक लोकांचं नोकरी करण्याचं कारण भीती हेच आहे. पैशांपासून दूर पळणे हा तेवढाच मोठा मूर्खपणा आहे जेवढा की पैशांमागे पळणे.
आर्थिक शिक्षणं का ?
Asset ( संपत्ती) – जे आपले पैसे वाढवत
Liability (दायित्व) – जे आपले पैसे कमी करत
संपत्ती निर्माण करणं हे, झाड लावण्यासारखं आहे. सुरवातीला तुम्ही त्याला रोज पाणी देता. पुढे ते एवढं मोठं होत की त्याला तुमची गरज राहत नाही. याउलट तेच तुम्हाला सावली,फळ देतं. श्रीमंत लोक संपत्ती जमा करतात. गरीब आणि मध्यमवर्गीय दायित्व. पैसे नसण्याच खर कारण हेच आहे की लोकांना संपत्ती आणि दायित्व मधला फरक कळत नाही. श्रीमंत बनायचं असेल, तर संपत्ती घेत राहा. गरीब बनायचं असेल तर दायित्व घेत राहा. झुंड सोबत चालणे आणि शेजाऱ्यांच्या ऐशोआरामाची नक्कल करणे, अनेक समस्यांचं मूळ आहे. शाळांना यासाठी बनवलं आहे की तिथे चांगले कर्मचारी तयार होतील, मालक नाही.
* तुमच्या कामाशी काम ठेवा
स्वतःसाठी काम करा. संपत्ती बनवण्यावर लक्ष्य द्या. दायित्वापासून दूर राहा.
अस्सल जीवनात हुशार नाही तर साहसी लोक पुढे जातात. अनेक लोक जीवनात संधी येण्याची वाट पाहत राहतात. ते संधी तयार करत नाहीत. अनेकांना तर आलेली संधी ओळखता पण येत नाही. वेळ ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. तुम्ही काय करत आहात, हे जर तुम्हाला माहित असेल तर तो जुगार नाही. धोका प्रत्येक गुंतवणुकीमधे असतो. पण ज्ञानाच्याआधारे तुम्ही धोका कमी करून जास्त परतावा मिळवू शकता. अनेक लोक फक्त यासाठी जिंकत नाहीत, कारण त्यांना हारायची भीती वाटते. शाळेत चूक केली की शिक्षा मिळते, पण जीवनात चुका करूनच आपण शिकतो.
* शिकण्यासाठी काम करा, पैशांसाठी नाही
सर्व गोष्टींबद्दल थोडं थोडं ज्ञान असू द्या. कर्मचारी एवढंच काम करतात की त्यांना कामावरून काढण्यात येऊ नये आणि मालक तेवढाच पगार देतात की कर्मचारी काम सोडून जाऊ नये. नोकरी करतांना युवकांनी किती कमावतो यापेक्षा किती शिकतो यावर भर द्यावा. जर नवीन गोष्टी शिकण्याची तुमची इच्छा नसेल, फक्त एकाच क्षेत्राचा तज्ञ तुम्हाला बनायचं असेल. तर अशा जागी नोकरी करा, जिथे मजदूर युनिअन असेल, ते तुमचा बचाव करेल. Business System बनवण्यावर भर द्या.
* अडथळ्यांवर मात करण्यासाठी -
1.भीती
2.आळस
3.वाईट सवयी
4.हट्ट
या गोष्टींवर मात करावी.
* सुरुवात करणे
तुम्हाला श्रीमंत का व्हायचं ? हे माहीत करून घ्या. येणारे अडथळे पार करायला ते तुम्हाला मदत करेल. तुमच्या ज्ञानात गुंतवणूक करा. तुमच्या मित्रांना सावधानपूर्वक निवडा, त्यांचा तुमच्यावर फरक पडतो. एका सूत्राचे तज्ञ बना, आणि नवे सूत्र शिका. आधी स्वतःला पैसे द्या. तुमच्या तज्ञाला चांगले पैसे द्या.
अजून हवंय? ‘हे करा’
जे करताय, ते करणं बंद करा. नवीन विचारांचा शोध घ्या.
पैसा बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे, तुमच्या विचारांवर काम करणं. ...अपूर्ण
Sirji mala food processing business karychs ahe tybabt margdrshn pyje
ReplyDelete