यशस्वी होण्यासाठी थोडेसे...


✔ *पुढाकार घेणे /स्वावलंबी होणे*
जे लोक योग्य वेळेची वाट पहात बसतात ते कुठेच पोहोचत नाहीत माझा मित्र/मैत्रीण सोबत असेल तरच मी एखादी गोष्ट करणार म्हणजे तुम्ही तुमचे यशाचे वेसण आपल्या मित्र/मैत्रीण च्या हातात दिले आहे. त्यामुळे स्वतःची प्रगती करण्यासाठी कोणावर अवलंबून राहू नका

✔ *कारण न देता जबाबदारी घेवून मार्ग काढणे.*
माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर "मार्ग सापडतो" आणि करायची नसेल तर "कारणं सापडतात.." आयुष्यात जे कारणं देतात ते कधीच यशस्वी होत नाहीत पण जे जबाबदारी घेवून मार्ग काढतात ते नक्की यशस्वी होतात

 ✔ *यशस्वी लोक कंटाळा करत नाहीत*
आज मला कंटाळा आला आहे उद्या करतो/ नंतर असेलच की/ आजुन खूप वेळ आहे असे उत्तर असेल  तर तुम्ही प्रगती करू शकत नाही. उत्साहाने स्वतःला मोठे करण्यासाठी धडपडा. जी वेळ आहे तीच योग्य असे मानून यशस्वी लोक आपले कार्य चालू करतात आणि कितीही कष्ट लागले तरी चालू ठेवतात.

✔ *विचार करत बसण्यापेक्षा कृती करा/प्रत्यक्षात उतरवा*
यशस्वी लोक कधीच चांगल्या विचाराचे नुसते गुणगान गात  बसत  नाहीत, ते आपल्यासाठी जे  चांगले आहे ते सर्व कृती मधे उतरवतात, निर्णय घेतात व त्यावर काम करतात.
जे फक्त चर्चा करत बसतात किंवा फक्त विचार करतात हे मी केले तर फायदा होइल का? जमेल का? अडचणी असतील का? ते लोक काहीही करू शकत नाहीत.

✔ *स्वतः ऊर्जेचा स्रोत बना*
यशस्वी लोक सकारात्मक असतात ते स्वतः सुरुवात करतात आणि इतरांना प्रेरणा देतात. जे स्वतः काहीच करत नाहीत व दुसरा जे करायला चालला त्याला नावं थेट बसतो तो कधीच यशस्वी होत नाही. यशस्वी लोक एकटे असले तरी ते प्रेरणा घेवून काम करत राहतात तसेच इतरांना ही प्रोत्साहित करतात.

Comments