बिझनेस गुरू


एकदा एका युरोपियन चाॅकलेट कंपनीने
सिटीमध्ये ऑर्डर घेण्या अगोदर
दहा बारा शाळांजवळ एक टेंट लावला
तेथे बोर्डवर आकर्षक पणे
चाॅकलेटची जाहिरात केली
तेथे कंपनीचे वीस मुले मुली उभ्या केल्या
ते जवळ येणारी मुले व मुलींना चाॅकलेट देत
व त्यांना सांगत होते की
याचे कव्हर/वेस्टन फेकू नका
दुकानादाराला दाखवा व सांगा
असे चाॅकलेट आहे का ?
असेल तर याच्या बदली/एक्सचेंज  तुम्हाला
एक चाॅकलेट मिळेल.
..
आठ दिवस ते वेष्टन संपुर्ण शहरभर फिरलं
आठ दिवसानंतर ते जेव्हा ऑर्डर घ्यायला गेले
टार्गेट पेक्षा दहा पट ऑर्डर मिळाली
आणि ते मार्केटमध्ये घुसले.
..
तात्पर्य काय की
बाजारपेठेत शिरकाव करणे महत्त्वाचे असते
जसे की बाहेरुन पाहिले तर
लोकल गच्च भरलेली दिसते
पण तुम्ही आत घुसता तेव्हा
तुमच्यासाठी आत आपोआप
जागा तयार होते
व लोकल सुटताच तुम्ही
कंफर्टेबल होता.
..
बिझिनेस चे सुध्दा असेच आहे
तुम्ही धाडस करून आत घुसा
थोड्या दिवसांत तुम्ही सरावुन जाल.
..

Comments