भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

👉 _*फायद्याची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना*_

सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरीता जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, सुधारित आदिवासी क्षेत्रांतर्गत उप-योजना, सुधारित आदिवासी क्षेत्राबाहेरील उप-योजना अंतर्गत पात्र लाभार्थींना मागणीनुसार व मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील घटकांचा लाभ देण्यात येणार आहे.

👉 _*डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत देय बाबी*_

● नवीन विहीर प्रती लाभार्थी देय उच्चतम अनुदान मर्यादा 2 लाख 50 हजार रुपये

● जुनी विहीर दुरुस्ती उच्चतम अनुदान मर्यादा 50 हजार रुपये

● शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण उच्चतम अनुदान मर्यादा 1 लाख रुपये

● वीज जोडणी आकार उच्चतम अनुदान मर्यादा 10 हजार रुपये

● पंपसंच उच्चतम अनुदान मर्यादा 25 हजार रुपये

● इनवेल बोअरिंग उच्चतम अनुदान मर्यादा 20 हजार रुपये

● सूक्ष्म सिंचन संच (अ) ठिबक संच उच्चतम अनुदान मर्यादा 50 हजार रुपये (ब) तुषार संच उच्चतम अनुदान मर्यादा 25 हजार रुपये

👉 _*सुधारित आदिवासी क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील उप-योजनेंतर्गत देय बाबी*_

● नवीन विहीर प्रती लाभार्थी देय उच्चतम अनुदान मर्यादा 2 लाख 50 हजार रुपये

● जुनी विहीर दुरुस्ती उच्चतम अनुदान मर्यादा 50 हजार रुपये

● शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण उच्चतम अनुदान मर्यादा 1 लाख रुपये

● वीज जोडणी आकार उच्चतम अनुदान मर्यादा 10 हजार रुपये

● परसबाग उच्चतम अनुदान मर्यादा 500 रुपये

● इनवेल बोअरिंग उच्चतम अनुदान मर्यादा 20 हजार रुपये

● सूक्ष्म सिंचन संच (अ) ठिबक संच उच्चतम अनुदान मर्यादा 50 हजार रुपये (ब) तुषार संच उच्चतम अनुदान मर्यादा 25 हजार रुपये

👉 _*लाभार्थी निवडीसाठी निकष*_

● डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी लाभार्थी हा अनुसूचित जाती/ नवबौध्द शेतकरी असावा.

● सुधारित आदिवासी क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील उपयोजनेसाठी लाभार्थी हा अनुसूचित जमाती / आदिवासी शेतकरी असावा.

● जमीन धारणेचा अद्ययावत 7/12 दाखला व 8 ‘अ’ उतारा आवश्यक असून शेतकऱ्यांच्या नावे एकूण जमीन धारणा 0.40 ते 6 हेक्टर मर्यादेत असावी.

● आधारकार्ड व आधारकार्ड संलग्न बँकखाते असणे आवश्यक आहे.

● दारिद्रय रेषेखाली असल्याबाबतचे प्रमाणपत्र / बीपीएल कार्ड असावे.

👉 _*अर्ज करण्यासाठी*_ : www.krishi.maharashtra.gov.in किंवा https://agriwell.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दि. 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत राहील.

👉 _*अधिक माहितीसाठी*_ : कृषी अधिकारी (विघयो), पंचायत समिती कार्यालये यांच्याकडे संपर्क करावा.

Comments

  1. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्ववलबन योजने अंंनतरगत 2018 च्या विहिरी बंदल सांगा

    ReplyDelete

Post a Comment