रिपाई रोजगार उद्योग निर्माण समिती

रिपाई रोजगार उद्योग निर्माण समितीला महाराष्ट्रतुन प्रचंड प्रतिसाद

                                                             मा.ना.रामदास आठवले साहेब केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता राज्य मंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शना नुसार दि.१० ऑक्टोबर २०१७ रोजी लोणावळा येथे रोजगार उद्योग व्यवसाय मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले या राज्यस्तरीय शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळाला व सर्वांच्या सूचना व आग्रह नुसार रिपाई रोजगार उद्योग निर्माण समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला व तसे अवाहन संपुर्ण महाराष्ट्रात करण्यात आले . 

रोजगार उद्योग निर्माण समिती मध्ये काम करण्याची अनेकांनी  इच्छा व्यक्त केली तरुणांना मध्ये रोजगार आणि उद्योगांची आवड निर्माण करून आंबेडकरी उद्योजक बनवण्यासाठी फार मोठी जबाबदारी असल्याने एक व्यक्ती हे काम करू शकत नाही म्हणून रोजगार उद्योग निर्माण समितीची कोअर कमिटी करून महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात समिती चे काम सुरू करण्यात येणार आहे ज्यांना कोअर कमिटी ,जिल्हा कमिटीत काम करण्याची इच्छा असल्यास स्थानिक जिल्हा , राज्य पदाधिकारी चे शिफारस घेऊन नाव नोंदविण्याचे अवाहन केलेले होते त्यानुसार महाराष्ट्र राज्यची ५१ लोकांची कोअर कमिटी बनविण्यात येत आहे त्या मध्ये खालील मान्यवरांचा समावेश करण्यात येत आहे
१) दीपक गमरे (मुंबई) 9869751868
२) अँड. बबनराव मोरे (मुंबई) 9323891123
३) सुमित वजाळे (मुंबई) 9892727062
४) अंकुश गायकवाड (डोंबिवली)
यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

 आपण देखील रोजगार उद्योग क्षेत्रात काम करण्यास तयार असाल तर आपले देखील हार्दिक स्वागत. रोजगार उद्योग निर्माण समिती मार्फत " रिपब्लिकन पक्ष आपल्या दारी घ्या नव्याने उभारी " हे अभियान राबविण्यात येत या साठी आपल्या मार्गदर्शनाची सहभागाची नितांत आवश्यकता आहे तरी कृपया मो. 9850260544 या क्रमांक वर आपले नाव , पत्ता जिल्हा व मोबाईल नंबर SMS करावा ही विनंती

Comments

  1. रांगोळी बनविण्यासाठी machine

    ReplyDelete

Post a Comment